Ad will apear here
Next
‘इंटिग्रेटेड लीगसी’चे नवे गाणे
‘इंटिग्रेटेड लीगसी’कोल्हापूर : ‘इंटिग्रेटेड लीगसी’ या कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध बँडने आणखी एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील गाण्याची निर्मिती केली आहे. ‘ए बंदेया’ हे नवीन, फ्रेश गाणे ‘इंटिग्रेटेड लीगसी’ने त्यांचे नुकतेच लाँच केले आहे. सकारात्मकतेवर भाष्य करणारे हे गाणे यू-ट्यूब, आयट्यून्स, स्पॉटिफाय, सावन, शाहजाम, अॅपल म्युझिक, साउंड क्लाउड यांसारख्या साइट्सवर उपलब्ध झाले आहे. 

‘इंटिग्रेटेड लीगसी’चे सदस्य‘इंटिग्रेटेड लीगसी’चे तरुण आपल्या प्रत्येक गाण्यातून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. ‘ए बंदेया’मधून तरुणांना निराशा झटकून पुन्हा नव्या जोमाने ध्येयाकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला आहे. सध्या छोट्या मोठ्या कारणाने खचून जाण्याची वृत्ती तरुणांमध्ये दिसून येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी हे गाणे नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते.

‘इंटिग्रेटेड लीगसी’चे सदस्यकोल्हापूरच्या तरुणांनी एकत्र येऊन ‘इंटिग्रेटेड लीगसी’ या बँडची स्थापना केली आहे. प्रथमेश देसाई (की-बोर्डिस्ट) अक्षय पाटील (लीड गिटारिस्ट), अनुराग राठोड (व्होकलिस्ट, ऱ्हिदम गिटारिस्ट), सोहम येवले (बेसिस्ट), रोहन कुलकर्णी (ड्रमर) यांचा या रॉक बँडमध्ये समावेश आहे.  

गाणे ऐकण्या/पाहण्यासाठी लिंक : https://youtu.be/vpX6mz5eg_4
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZANBB
Similar Posts
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी मालिका - अंजली मुंबई : ‘झी युवा’वर २२ मेपासून सोमवार ते शुक्रवारी रात्री आठ वाजता एक नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेचे नाव आहे ‘अंजली.’ ही मालिका हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर घडते. एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अंजलीची ही गोष्ट आहे. या मालिकेत अंजलीच्या शीर्षक भूमिकेत सुरुची
‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’ कोल्हापूर : ‘सामाजिक समस्यांची जाण असल्याने संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच दिल्ली दरबारात कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. बास्केट ब्रिज, रेल्वे स्टेशन, विमानतळ, कोकण रेल्वे यांसह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे
‘अनाज इंडिया’च्या पुरस्काराने रावसाहेब पुजारी यांचा गौरव कोल्हापूर : कृषी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांचा ‘अनाज इंडिया’ या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गांधीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुजारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘असोसिएशन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language